६० वर्षांच्या वृद्धाचे अजब प्रेम; मंदिरात लागलं लग्न!


मुंबई/कटिहार: निर्भीड समाचार वृत्तसेवा

बिहारच्या कटिहार जिल्हा अंतर्गत येणाऱ्या मनिहारी अनुमंडलातील बाघमारा पंचायत क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक आणि अनोखी प्रेम कहाणी समोर आली आहे. येथे एका ६० वर्षीय वृद्धाचे एका महिलेवर जडलेलं प्रेम इतके गहिरे झाले की, अखेर ग्रामपंचायतीला मध्यस्थी करून या दोन्ही प्रेमी युगुलाचा विवाह चक्क एका मंदिरात लावून द्यावा लागला. सध्या या अनोख्या विवाहाची चर्चा संपूर्ण बिहारसह सोशल मीडिया आणि चौकाचौकांतील चहाच्या टपऱ्यांवर रंगू लागली आहे

दोन वर्षांचे गुप्त प्रेमसंबंध
मिळालेल्या माहितीनुसार, कटिहारच्या मनिहारी भागातील बाघमारा गावात राहणाऱ्या एका ६० वर्षांच्या वृद्धाचे गावातीलच एका महिलेशी गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. वाढत्या वयात झालेल्या या प्रेमाची त्यांनी सुरुवातीला गुप्तता बाळगली होती. मात्र, त्यांचे हे प्रेम जास्त काळ गावकऱ्यांच्या नजरेतून लपू शकले नाही. हळूहळू या जोडप्याच्या गुप्त भेटीगाठींची कुणकुण गावकऱ्यांना लागली आणि संपूर्ण गावात या विचीत्र प्रेमाची चर्चा सुरू झाली.

गावात गदारोळ आणि पंचायतीची बैठक
बुधवारी (१३ मे २०२६) रात्रीच्या सुमारास या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर गावात मोठा गदारोळ निर्माण झाला. काही लोकांनी या नात्याला सामाजिक परंपरेच्या विरोधात असल्याचे सांगत आक्षेप घेतला. गावातील वातावरण तणावपूर्ण बनल्याचे पाहून स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि गावकऱ्यांनी तातडीने ग्रामपंचायतीची बैठक बोलावली.

पंचायतीच्या बैठकीत सुरुवातीला दोन्ही बाजूंना आणि या जोडप्याला समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाढत्या वयात अशा प्रकारच्या संबंधांमुळे समाजावर काय परिणाम होईल, असे मुद्दे मांडले गेले. मात्र, ६० वर्षांचे वृद्ध प्रेमी आणि ती महिला आपल्या निर्णयावर पूर्णपणे ठाम होते. “आम्ही एकमेकांशिवाय जगू शकत नाही आणि आम्हाला एकत्रच राहायचे आहे,” अशी भूमिका त्यांनी पंचायतीसमोर घेतली.

Advertisement

मंदिरात रंगला विवाह सोहळा
जोडप्याचा एकमेकांसोबत राहण्याचा हट्ट पाहता, गावातील वाद आणि रोजचा गदारोळ कायमचा संपवण्यासाठी पंचायतीने एक मोठा निर्णय घेतला. गावकऱ्यांच्या आणि पंचायतीच्या संमतीने या दोघांचा विवाह लावून देण्याचे ठरले. त्यानंतर रात्रीच्या वेळीच संपूर्ण गावकऱ्यांच्या उपस्थितीत या जोडप्याला गावातील एका मंदिरात नेण्यात आले. तेथे धार्मिक विधींनुसार ६० वर्षांच्या वृद्ध प्रेमिकाने आपल्या प्रेयसीच्या भांगेत सिंदूर भरला आणि तिला आपली कायदेशीर पत्नी म्हणून स्वीकारले. विवाह संपन्न होताच मंदिरात उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी टाळ्या वाजवून या नवदाम्पत्याला आशीर्वाद दिला व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

“कोणताही दबाव नव्हता” – जोडप्याची प्रतिक्रिया
या अनोख्या लग्नानंतर संबंधित महिला आणि त्या वृद्धाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महिलेने अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आम्ही दोघे गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होतो. हा विवाह आम्ही कोणत्याही दबावाशिवाय, संपूर्ण कौटुंबिक व सामाजिक शुद्धीवर राहून आणि आमच्या स्वतःच्या इच्छेने केला आहे.” ६० वर्षीय नवरदेवाच्या पतीनेही या विधानाला दुजोरा दिला असून, आपल्या पत्नीला आयुष्यभर सुखात ठेवण्याचे वचन दिले आहे.

सोशल मीडियावर जोरदार चर्चा
या विवाहाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.परंतु, टीका आणि कौतुकाच्या पलीकडे जाऊन या वृद्ध जोडप्याने कटिहार जिल्ह्यात एका नव्या चर्चेला जन्म दिला आहे. मनिहारीच्या चहाच्या टपऱ्यांवर सध्या ‘अजब प्रेम की गजब कहाणी’ याच एका विषयावर गप्पा रंगताना दिसत आहेत.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x