“मुंबईची ‘लाईफलाईन’ खासगीकरणाच्या विळख्यात? बेस्टच्या ताफ्यात स्वतःच्या अवघ्या २४९ बसेस शिल्लक!”


मुंबई : निर्भीड समाचार News Desk

मुंबईची दुसरी जीवनवाहिनी मानली जाणारी ‘बेस्ट’ (BEST) सेवा सध्या अत्यंत कठीण टप्प्यातून जात आहे. एकेकाळी मुंबईच्या रस्त्यांवर डौलाने धावणाऱ्या बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या बसेसची संख्या आता अवघ्या २४९ वर आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२४ मध्ये बेस्टच्या स्वतःच्या १०९८ बसेस सेवेत होत्या. ही संख्या एप्रिल २०२५ मध्ये ७५७ पर्यंत खाली आली आणि जानेवारी २०२६ पर्यंत ती केवळ २४९ उरली आहे. १५ वर्षे पूर्ण झालेल्या जुन्या गाड्या भंगारात काढल्यामुळे (Scrapping) स्वतःच्या मालकीचा ताफा झपाट्याने कमी झाला असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. स्वतःच्या बसेस कमी झाल्या असल्या तरी, बेस्टची सेवा सध्या कंत्राटदारांच्या (Wet Lease) सुमारे २,५०० बसेसच्या जीवावर सुरू आहे. मुंबईकरांची गरज भागवण्यासाठी १० ते १५ हजार बसेसची आवश्यकता असताना, प्रत्यक्षात केवळ २,६५० बसेसचा एकूण ताफा उपलब्ध आहे. यामुळे बेस्टचे पूर्णपणे खासगीकरण होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Advertisement

या परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात ३,०८८ नवीन बसेस खरेदी करण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये इलेक्ट्रिक सिंगल डेकर आणि वातानुकूलित डबल डेकर बसेसचा समावेश असेल. तसेच केंद्राच्या ‘PM E-Drive’ योजनेअंतर्गत १,५०० मिडी एसी बसेस भाड्याने घेतल्या जाणार आहेत.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x