नरेंद्र मोदींची शरद पवारांना ऑफर

नंदुरबार : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात प्रचारसभा घेत आहे. नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात असून त्यांनी नंदुरबार येथे जनतेला संबोधित केलं. यावेळी बोलताना नरेंद्र मोदींना केलेल्या वक्तव्याची सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे. नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. तसेच शरद पवारांना थेट ऑफर देखील दिली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
बारामतीच्या निवडणुकीनंतर शरद पवार चिंतेत आहेत. नकली शिवसेना आणि NCP काँग्रेसमध्ये विलीन होतील असं देखील नरेंद्र मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर टीका केली असली, तरी त्यांना एक ऑफर सुद्धा दिली आहे. शरद पवारांनी एकनाथ शिंदे, अजित पवारांसोबत एनडीएमध्ये यावं, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतील असं नरेंद्र मोदी म्हणालेत.
४ जूननंतर ज्यांना राजकारणामध्ये टिकून राहायचं असेल अशा छोट्या-छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल, असं त्यांना वाटतं. मात्र काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत या, अशी ऑफर मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दिली आहे. आता यावर ठाकरे आणि पवार यांच्याकडून काय प्रत्युत्तर येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.




