“मुंबई ही जिद्दी स्त्रियांची कर्मभूमी; ‘मिड-डे’च्या व्यासपीठावर रितुताई तावडेंनी फुंकले महिला सक्षमीकरणाचे रणशिंग”


मुंबई : निर्भीड समाचार News Desk

समाजाच्या विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाने क्रांती घडवणाऱ्या सामर्थ्यशाली महिलांचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘मिड-डे पॉवरफुल वुमेन २०२६’ या दिमाखदार सोहळ्यास मुंबईच्या महापौर रितुताई तावडे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील यशस्वी महिलांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना रितुताई तावडे म्हणाल्या की, “मुंबई ही अशा अनेक जिद्दी स्त्रियांची कर्मभूमी आहे, ज्यांनी शून्यातून विश्व उभे केले आहे. आज सन्मानित झालेल्या महिलांचे यश केवळ वैयक्तिक नसून, तो संपूर्ण स्त्रीशक्तीचा आणि आपल्या प्रगत शहराचा विजय आहे.” पुरस्कार प्राप्त महिलांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या संघर्षाचे आणि यशाचे कौतुक केले.

Advertisement

अशा प्रेरणादायी व्यासपीठामुळे महिला सक्षमीकरणाला केवळ व्यासपीठ मिळत नाही, तर नव्या पिढीतील मुलींनाही त्यातून उभारी मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले. या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी ‘मिड-डे’ समूह आणि आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x