निकालाचा मार्ग मोकळा! मुंबई महानगरपालिका अभियंता भरतीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय.


मुंबई : निर्भीड समाचार News Desk

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता (JE) भरती २०२४-२५ चा निकाल कायदेशीर प्रक्रियेत अडकल्याने उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला असून, प्रलंबित निकाल लवकरात लवकर जाहीर करण्यासाठी तांत्रिक समन्वय साधण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश महापौर रितुताई तावडे यांच्याकडून देण्यात आले आहेत.

या प्रकरणातील कायदेशीर अडथळे दूर करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, नगर अभियंता श्री. राम कदम आणि कायदा अधिकारी सौ. कोमल पंजाबी यांच्या उपस्थितीत नुकतीच एक आढावा बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, प्रकरणाची पुढील सुनावणी ९ मार्च २०२६ रोजी होणार असली तरी, त्यापूर्वीच महापालिकेचे वकील आणि उमेदवारांच्या वकिलांची संयुक्त बैठक आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या समन्वयामुळे न्यायालयासमोर तांत्रिक बाजू स्पष्ट होऊन निकाल लावणे सुलभ होणार आहे.

Advertisement

कनिष्ठ अभियंता भरतीसोबतच, प्रतीक्षा यादीतील दुय्यम अभियंता (Sub-Engineer) पदाच्या उमेदवारांनाही मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या पदाची निवड यादी त्वरित जाहीर करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाशी तातडीने चर्चा करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

उमेदवारांचे शैक्षणिक वर्ष आणि करिअरचे नुकसान टाळण्यासाठी हा निकाल वेळेत लागणे आवश्यक आहे. तांत्रिक पेच सोडवून ही प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे,” असे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या निर्णयामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Translate »
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x