भावुक प्रतिक्रिया Archives - Nirbhid Samachar

चिमुकलीला निष्प्राण पाहताच वेदना झाली; विजयमाला पवारांची प्रतिक्रिया!
मुंबई : निर्भीड समाचार वृत्तसेवा

भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा अंतिम निकाल लागला असून, नराधम आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची कठोर शिक्षा सुनावली आहे. या खटल्याचा अवघ्या ५८ दिवसांत छडा लावून आरोपीला फाशीच्या खांबापर्यंत पोहोचवण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपास यंत्रणेने अत्यंत मोलाची भूमिका बजावली. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करणाऱ्या तपास अधिकारी तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी निकालानंतर माध्यमांशी बोलताना अत्यंत भावनिक आणि काळजाचा थरकाप उडवणारी प्रतिक्रिया दिली आहे.

“एक स्त्री आणि एका मुलाची आई म्हणून जेव्हा मी त्या निष्पाप चिमुकलीचा मृतदेह पाहिला, तेव्हा माझ्या मनाला प्रचंड मोठी वेदना झाली. पण, त्या क्षणी मी माझ्या वैयक्तिक भावना बाजूला ठेवल्या आणि एका पोलीस अधिकाऱ्याचे कर्तव्य पहिल्या स्थानी ठेवून नराधमाला फाशी मिळेपर्यंत लढण्याचा निर्धार केला,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

“चिमुकलीला निष्प्राण पाहताच डोळ्यात पाणी आले” — विजयमाला पवार

गुन्ह्याच्या पहिल्या दिवसाच्या तपासाची आठवण काढताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार म्हणाल्या, “१ मे रोजी जेव्हा ती चिमुरडी बेपत्ता झाली आणि त्यानंतर तपास करत असताना तिचा मृतदेह त्या गोठ्यातील शेणाच्या ढिगाऱ्यात लपवलेला आढळला, तो प्रसंग मी कधीही विसरू शकत नाही. त्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीला निष्प्राण अवस्थेत पाहताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. एक आई म्हणून माझ्या डोळ्यात अश्रू आले. पोटात प्रचंड गोळा आला की एक ६५ वर्षांचा वृद्ध माणूस एवढ्या लहान बाळासोबत असं अमानुष कृत्य कसं करू शकतो?”

त्यांनी पुढे सांगितले की, जर त्या क्षणी मी एका आईच्या भावनेत वाहून गेले असते, तर कदाचित तपासावर परिणाम झाला असता. त्यामुळे मी स्वतःला सावरले. माझ्या खांद्यावरील वर्दीची आणि कर्तव्याची मला जाणीव झाली. या चिमुकलीला आणि तिच्या हताश माता-पित्याला न्याय मिळवून देणे, हेच आता माझ्या आयुष्याचे एकमेव ध्येय आहे, हे मी मनाशी पक्के केले.

कडक बंदोबस्त आणि १५ दिवसांत मजबूत दोषारोपपत्रहा गुन्हा अत्यंत संवेदनशील असल्याने समाजात तीव्र संताप होता. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली विजयमाला पवार यांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली.”आम्ही तपासात एकही त्रुटी ठेवू इच्छित नव्हतो. आरोपी सराईत असल्याने त्याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, आम्ही तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय व डीएनए (DNA) अहवाल गोळा करण्यावर भर दिला,” असे पवार यांनी स्पष्ट केले. त्यांच्या पथकाने अहोरात्र काम करून अवघ्या १५ दिवसांत न्यायालयात १२०० पानांचे मजबूत दोषारोपपत्र (Charge sheet) दाखल केले, जे या केसचा टर्निंग पॉईंट ठरले.

“हा निकाल माझ्या पोलीस कारकिर्दीतील सर्वात मोठे समाधान”विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात मांडलेले भक्कम पुरावे आणि विजयमाला पवार यांनी केलेल्या अचूक तपासामुळेच न्यायालयाने ५० हून अधिक साक्षीदार तपासून आरोपीला दोषी ठरवले.न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला ‘मरेपर्यंत फाशी’ सुनावल्यानंतर विजयमाला पवार यांच्या डोळ्यातील अश्रू हे समाधानाचे होते. त्या म्हणाल्या, “आज न्यायालयाने पीडित कुटुंबाच्या भावनांचा आदर केला आहे. कोर्टाने जेव्हा निकाल दिला, तेव्हा मला असे वाटले की मी माझ्या कर्तव्याला पूर्ण न्याय देऊ शकले. माझ्या पोलीस कारकिर्दीतील हा सर्वात कठीण पण सर्वात जास्त समाधान देणारा तपास होता. या निकालामुळे समाजात एक कडक संदेश जाईल आणि भविष्यात कोणत्याही नराधमाची अशा कृत्याची हिंमत होणार नाही.”

शेवटी त्यांनी या लढ्यात साथ देणाऱ्या पीडित कुटुंबाचे, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आणि न्यायालयाचे आभार मानले.

The post चिमुकलीला निष्प्राण पाहताच वेदना झाली; विजयमाला पवारांची प्रतिक्रिया! appeared first on Nirbhid Samachar.