खळबळजनक आरोप Archives - Nirbhid Samachar

“दम असेल तर समोरासमोर या!” रविराज साबळे-पाटलांचे देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान..!!
मुंबई : निर्भीड समाचार News Desk

राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच, शेतकरी प्रश्नांवरून आक्रमक पवित्रा घेणारे रविराज साबळे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. “फडणवीसांनी मला संपवण्याचा कट रचला असून, माझ्या घराची रेकी केली जात आहे,” असा खळबळजनक दावा साबळे-पाटील यांनी एका व्हिडिओद्वारे केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

“समोरासमोर येऊन भिडा, छक्के-चाळे करू नका”

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये रविराज साबळे पाटील यांनी थेट फडणवीसांना आव्हान दिले आहे. ते म्हणाले, “फडणवीस साहेब, सीआयडी मार्फत असले छक्के-चाळे करण्यापेक्षा समोरासमोर येऊन भिडा. रोज नोटीसा काय देता? माझ्या घराची रेकी का करताय? आम्ही सामान्य माणसं म्हणून जगतोय, त्यात माझ्या घरच्यांना कशाला त्रास देताय? जर दम असेल तर समोरासमोर येऊन चर्चा करा, मग ठरवू कोणाची काय लायकी आहे ते!”

प्रशासकीय दबावाचा आरोप

साबळे-पाटील यांनी पुढे असाही आरोप केला की, “मी तुम्हाला प्रश्न विचारले म्हणून तुम्ही कोणत्या ना कोणत्या प्रशासकीय व्यक्तीकडून माझ्यावर दबाव आणत आहात. मी कोण आहे, हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे. तुमच्या ‘अंधभक्तांना’ आवरा, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.”

“शेतकऱ्याची औलाद आहे, शेवटपर्यंत लढणार”

जीवाचे बरेवाईट होण्याची भीती व्यक्त करताना ते म्हणाले, “तुम्ही मला संपवण्याचा कट रचलाय. मला मारून टाका, पण जोपर्यंत माझ्यात जीव आहे, तोपर्यंत मी प्रश्न विचारतच राहणार. मी शेतकऱ्याची औलाद आहे, व्यवस्थेत क्रांती घडवूनच देह ठेवणार!”

या गंभीर आरोपानंतर आता सत्ताधारी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एका सामान्य कार्यकर्त्याला अशा प्रकारे प्रशासकीय यंत्रणेचा धाक दाखवला जात असेल, तर तो चिंतेचा विषय असल्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगू लागली आहे.

The post “दम असेल तर समोरासमोर या!” रविराज साबळे-पाटलांचे देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान..!! appeared first on Nirbhid Samachar.